- abaashishb7
- March 6, 2023
- 12:20 pm
💖वाढदिवसाच्या अनेक अनेक शुभेच्छा💖
Birthday
खरंतर वाढदिवस हा तुमच्या जीवनाची सुरुवात आणि जीवनातील आनंद अधोरेखित करणारा दिवस आहे. वाढदिवशी आलेला प्रत्येक संदेश हा नाते फुलवणारा असतो. नात्यातले प्रेम द्विगुणित करणारा असतो. वाढदिवस म्हंटला की शुभेच्छा आल्याच. ज्याचा वाढदिवस असतो त्या आपल्या लाडक्या व्यक्तीला आजकाल वेगवेगळ्या सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा द्यायचा जणू ट्रेंडच झालाय. सगळीकडून हार्दिक शुभेच्छांचा जणू वर्षाव सुरू असतो. त्यात ही जर या शुभेच्छा मराठीतून मिळाल्या तर त्याचं महत्व जरा जास्तच असतं.
BIRTHDAY
सोनेरी सूर्याची चमकदार किरणे,
चमकदार किरणांचा मंगलमय दिवस,
मंगलमय दिवसाच्या अनेक शुभेच्छा
केवळ सोन्यासारख्या लोकांना,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
Birthday
तुमच्या स्वप्नांना किनारा नसावा,
तुमच्या इच्छाशक्तीला प्रतिबंध नसावा,
जेव्हा तुम्ही एक तारा मागणार
तेव्हा देव तुम्हाला सर्व आकाश देवो!!
जल्लोष आहे सार्या गावाचा,
कारण वाढदिवस आहे,
माझ्या भावाचा!!
BIRTHDAY
तुला तुझ्या आयुष्यात सुख, आनंद, यश लाभो,
तुझे जीवन हे उमलत्या फुलासारखे
फुलून जाओ
त्याचा सुगंध तुझ्या संपुर्ण आयुष्यात
दरवळत राहो,
हीच तुला वाढदिवसानिमित्त ईश्वरचरणी प्रार्थना.
Birthday
तुमच्या इच्छा तुमच्या आकांक्षा
उंच उंच भरारी घेऊ दे
मनात आमच्या एकच इच्छा,
आपणास उदंड आयुष्य आणि
निरोगी आयुष्य लाभू दे...
BIRTHDAY
माझ्या घराला घरपण आणणारी
आणि आपल्या प्रेमळ स्वभावाने
घराला स्वर्गाहूनही सुंदर बनवणाऱ्या
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
Birthday
देव तुझ्या सर्व इच्छा पूर्ण करो व
तुला सुख, समृद्धी, मनःशांती आणि
निरोगी दीर्घायुष्य लाभो हीच कामना.
तुला वाढदिवसाच्या अनेक अनेक शुभेच्छा.
BIRTHDAY
संकल्प असावेत नवे तुझे,
मिळाव्यात त्यांना नव्या दिशा,
प्रत्येक स्वप्न पूर्ण व्हावे तुझे!!!
Birthday
हे देवा माझ्या भावाला
सुख, वैभव, यश, समृद्धी भरभरून दे,
उत्तम आरोग्य दे, कधी खचला मनाने तर
सामना करण्याची शक्ति दे,
आणि त्याच्यावर तुझा वरद हस्त रुपी
आशिर्वाद कायम राहू दे.
माझ्या भावाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
BIRTHDAY
दिवस आहे आज खास,
तुला उदंड आयुष्य लाभो हाच मनी ध्यास.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
येणार्या आयुष्यात आपल्या प्रेमाला
एक नवीन पालवी फुटू दे
एकमेकांवरील प्रेम आणि आनंद कायम राहू दे
Birthday
आयुष्याच्या आकाशात ढग असेही दाटून येतील....
कधी सुखांची हलकी रिमझिम,
कधी दुःख घनदाट बरसतील....
सुख दुःखांचे थेंब सारे स्वच्छंद झेलत रहा....
आयुष्याची आव्हाने सारी अशीच पेलत रहा....
BIRTHDAY
नवे क्षितिज, नवी पहाट
फुलावी आयुष्यातील स्वप्नांची वाट
स्मितहास्य तुमच्या चेहर्यावर राहो सदा
तुमच्या पाठीशी हजारो
सुर्य तळपत राहो सदा...
जे जे हवे तुम्हाला ते ते मिळु दे,
भाग्यवान या शब्दाचा अर्थ
तुमच्याकडे पाहुन कळू दे,
शिखरे यशाची सर तुम्ही करावी,
पाहता वळुनी मागे शुभेच्छा माझी स्मरावी,
तुमच्या आनंदाचा वेल गगनाला भिडू दे,
आयुष्यात तुमच्या सर्व काही मनासारखे घडू दे.
BIRTHDAY
वाढदिवसाचा सुखद क्षण
तुम्हाला आनंद देत राहो,
या दिवसाचा अनमोल क्षण
तुमच्या हृदयात कायम राहो
जगातील सगळ्या चांगल्या गोष्टी
तुमच्या आयुष्यात घडू द्या
कारण तुम्ही नक्कीच सर्वोत्तम
लोकांपैकी एक आहात.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
झेप अशी घ्या की पाहणाऱ्यांच्या
माना आपोआप वर व्हाव्यात,
आकाशाला असे संचार करा की
पक्ष्यांनाही प्रश्न पडावा,
ज्ञान इतके मिळवा संपुर्ण
सागर अचंबित व्हावा,
इतकी प्रगती करा काळ ही पाहत रहावा,
कार्याचा लख्ख प्रकाश चोहीकडे पसरेल.
BIRTHDAY
सुगंधी पुष्पाने भरलेले तुमचे जीवन असावे,
सुख समृद्धीने संपूर्ण आपले आयुष्य व्हावे.
आपणास शिवनेरीची श्रीमंती,
रायगडाची भव्यता,
पुरंदरची दिव्यता, सिंहगडाची शौर्यता
आणि सह्याद्रीची उंची लाभो
या जन्मदिनी शुभ क्षणांनी आपली
सारी स्वप्न साकार व्हावी,
आजचा वाढदिवस आपल्यासाठी
एक अनमोल आठवण ठरावी
आणि त्या आठवणीने आपल आयुष्य
अधिकाधिक सुंदर व्हावं
हीच शुभेच्छा.
नमस्कार
तुमचे CREATION9 या आपल्या वेबसाईटवर स्वागत आहे.
Connect With Us
Category
विचार
* महत्त्वाच्या लिंक्स
💖आभार💖
आपण दिलेल्या शुभेछांचा माझ्यावर वर्षावच झाला,
आपल्या याच शुभेछांमुळे माझा आनंद द्विगुणित झाला,
खरेच आपण वेळात वेळ काढून मला शुभेच्छा दिल्याबद्दल मनापासून आभार,
असेच चांगल्या वाईट प्रसंगात नेहमी माझ्या पाठीशी उभे रहा.
धन्यवाद.
आपल्यासारख्या मित्रांकडून मिळालेल्या शुभेछांमुळे
माझा वाढदिवस खुपच आनंददायक बनला आहे
असेच प्रेम नेहमी राहु द्या.
वाढदिवस येतात आणि जातातही
पण तुमच्यासारखे जीवास जीव लावणारे मित्र आणि कुटुंब
नेहमीच सोबत राहतात.
शुभेच्छा दिल्याबद्दल मनःपूर्वक आभार.
वाढदिवशी किती वय वाढले
यापेक्षा किती नवीन माणसे जोडली गेली हे महत्त्वाचे...
आज लक्षात आले,
माझ्या जीवनातील माणसाची गणना अगणित आहे. यासाठी आपणा सर्वांचे मनःपूर्वक आभार....!
धन्यवाद.
माझ्या वाढदिवसानिमित्त आपण सर्वांनी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरीत्या
शुभेछा रुपी स्नेह व्यक्त केल्याबद्दल सार्यांना मनापासून धन्यवाद.
तुम्ही दिलेल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा कोणत्याही भेटवस्तू पेक्षा सुंदर, कोणत्याही केक पेक्षा आणि कोणत्याही मेणबत्तीच्या प्रकाशापेक्षा जास्त चमकदार आहेत. भरभरून प्रेम देणार्या माझ्या सर्व मित्र मैत्रिणींना तसेच वडीलधारी व्यक्तींचे मनःपूर्वक आभार.
वाढदिवस हा एक दिवसाचा इव्हेंट आहे
पण आपण दिलेल्या मनापासून दिलेल्या शुभेच्छा
माझ्यासोबत नेहमीच राहतील.
माझा आनंद द्विगुणित केल्याबद्दल मनापासून आभार.
सुरवातीला होती आपली फक्त ओळख नंतर मिसळले त्यात मैत्रीचे बंध आणि आता जाणवू लागला आहे आपुलकी, प्रेम, जिव्हाळ्याचे गंध... माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपण ज्या प्रेमरुपी सदिच्छा, शुभेच्छा दिल्याबद्दल मी आपला खुप खुप ऋणी आहे.
तुमचा आणि माझा ऋणानुबंध असाच चालत रहावा हीच प्रार्थना. आपले खुप खुप धन्यवाद.
धावपळीच्या जीवनातील हे क्षण सुखदायक असतात तेव्हा आपल्यासारख्या
प्रियजनांच्या शुभेच्छा येतात.
वाढदिवसाच्या गोड शुभेच्छांबद्दल सर्वांचे मनापासून आभार!!!
💖धन्यवाद💖
- abaashishb7
- March 6, 2023
- 12:20 pm