- abaashishb7
- March 6, 2023
- 1:19 pm
💖मकरसंक्रांतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा💖
Makarsankrant
मकरसंक्रांत हा भारतातील पौष महिन्यात येणारा एक शेती संबंधित सण आहे. सौर कालगणनेशी संबंधित असा हा महत्त्वाचा भारतीय सण आहे. भारतीय संस्कृती ही कृषी संस्कृती आहे. या दिवसांमध्ये शेतांत आणि मळ्यांमध्ये आलेल्या धान्याचे वाण एकमेकांना स्त्रिया देतात. हरबरे, ऊस, बोरे, गव्हाच्या ओंब्या, तीळ अशा गोष्टी सुगडात भरून त्या देवाला अर्पण करतात. बायका उखाणे घेतात. हा सण जानेवारी महिन्यात व हिंदू पंचांगाप्रमाणे पौष महिन्यात येतो. मकरसंक्रांतीला महाराष्ट्रात नुसतेच संक्रांत म्हणतात. मकर संक्रांती (उत्तरायण/ माघी/ संक्रांती), ज्याला पश्चिम बंगालमध्ये मोकोर सोनक्रांती म्हणूनही ओळखले जाते आणि नेपाळमध्ये माघेसंक्रांती, येथे 'संक्रांती' म्हणजे 'हस्तांतरण', हा दिवस सूर्याचा मकर राशीत संक्रमण दिवस मानला जातो. आता हिंदू दिनदर्शिकेमध्ये सूर्य उत्तरेकडे सरकतो. सूर्य या देवतेला समर्पित, अनेक स्थानिक बहु-दिवसीय उत्सव संपूर्ण भारतात आयोजित केले जातात. ग्रेगोरियन दिनदर्शिकेनुसार जानेवारी महिन्याशी सुसंगत सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तो दिवस दरवर्षी साजरा केला जातो. सूर्याच्या मकर राशीत प्रवेशाचा तो पहिला दिवस आहे. लीप वर्षांमध्ये एक दिवस जोडल्यामुळे, मकरसंक्रांतीची तारीख थोडी बदलू शकते. लीप वर्षात मकरसंक्रांत 15 जानेवारीला येते, अन्यथा 14 जानेवारीला. मकरसंक्रांती सामाजिक सण जसे की रंगीबेरंगी सजावट, ग्रामीण मुलांनी घरोघरी जाणे, गाणी गाणे आणि काही भागात भेटवस्तू मागणे, मेळे, नृत्य, पतंग उडवणे, बोनफायर आणि मेजवानी यांसारख्या सामाजिक उत्सवांनी साजरी केली जाते. इंडोलॉजिस्ट डायना एल. एक यांच्या मते महामेळ्याचा उल्लेख हिंदू महाकाव्य महाभारतात आहे. अनेक निरीक्षक पवित्र नद्या किंवा तलावांवर जातात आणि सूर्याला धन्यवाद देण्यासाठी स्नान करतात. दर बारा वर्षांनी, हिंदू कुंभमेळ्यासह मकर संक्रांत पाळतात - जगातील सर्वात मोठ्या सामूहिक तीर्थक्षेत्रांपैकी एक, अंदाजे 50 ते 80 दशलक्ष लोक या कार्यक्रमाला उपस्थित राहतात. या कार्यक्रमात, ते सूर्याला प्रार्थना करतात आणि गंगा आणि यमुना नदीच्या प्रयागराज संगमावर स्नान करतात, ही परंपरा आदि शंकराचार्यांना दिली जाते.
MAKARSANKRANT
विसरून जा दुःख तुझे हे,
मनालाही दे तु विसावा..
आयुष्याचा पतंग तुझा हा,
प्रत्येक क्षणी गगनी भिडवा...
मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा
Makarsankrant
म... मराठमोळा सण
क... कणखर बाणा
र... रंगीबेरंगी तिळगूळ
सं... संगीतमय वातावरण
क्रां... क्रांतीची मशाल
त... तळपणारे तेज
मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा
कणभर तिळ मणभर प्रेम
गुळाचा गोडवा आपुलकी वाढवा
तिळगूळ घ्या गोड गोड बोला
मकरसंक्रांतीच्या गोड गोड शुभेच्छा.
MAKARSANKRANT
नाते तुमचे आमचे
हळुवार जपायचे...
तिळगूळ हलव्यासंगे
Makarsankrant
शुभेछांनी अवघे अंगण तुमचे भरावे,
दुःख असावे तिळासारखे,
आनंद असावा गूळासारखा,
जीवन असावे तिळगुळासारखे...
मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा...
मराठी अस्मिता मराठी मन,
मराठी परंपरेची मराठी शान,
आज संक्रांतीचा सण,
घेऊन आला नव चैतन्याची खाण.
Makarsankrant
गगनात उंच उडता पतंग
संथ हवेची त्याला साथ,
मैत्रीचा हा नाजूक बंध,
नाते आपुले राहो अखंड.
MAKARSANKRANT
तिळाची ऊब लाभो तुम्हाला,
गुळाचा गोडवा येवो जीवनाला,
यशाची पतंग उडो गगनावरती
तुम्हास आणि तुमच्या परिवारास
शुभ संक्रांती...
MAKARSANKRANT
तिळ आणि गुळासारखी रहावी,
आपली मैत्री घट्ट आणि मधुर रहावी,
नात्यातील कटुंता इथेच संपवा,
तिळगूळ घ्या नी गोड गोड बोला.
मानत असते आपुलकी,
म्हणुन स्वर होतो ओला
तिळगूळ घ्या गोड गोड बोला.
MAKARSANKRANT
तिळात मिसळला गुळ,
त्याचा केला लाडू,
दुःख सारे विसरून जाऊ,
गोड गोड बोलुन आनंदाने राहु,
नवीन उत्सवाचे स्वागत करू चला,
तिळगूळ घ्या गोड गोड बोला..
MAKARSANKRANT