- abaashishb7
- March 6, 2023
- 1:23 pm
💖नुतन वर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा💖
New Year
नवीन वर्षाबाबत नेहमीच लोकांमध्ये एक वेगळाच उत्साह असतो. अनेक लोक हा दिवस वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करतात. काहीजण पार्टी करतात, काहीजण बाहेर फिरायला जातात तर काही लोक दान-धर्म करून नवीन वर्षाचे स्वागत करतात. 31 डिसेंबरच्या रात्रीपासून सुरू होणारा नववर्षाचा उत्सव पुढील एक-दोन दिवस चालतो. परंतु, तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की नवीन वर्ष नेहमीच 1 जानेवारीला साजरे केले जात नव्हते. अनेक वर्षांपूर्वी नवीन वर्षाची सुरुवात मार्चपासून होत होती. रोमन शासक ज्युलियस सीझरने 1 जानेवारीपासून नवीन वर्ष सुरू केल्याचे सांगितले जाते, त्याआधी मार्चमध्ये नववर्ष साजरे होत असे. परंतु अधिकृतरीत्या जानेवारीपासून नववर्ष साजरे करण्याची सुरुवात पोप ग्रेगरी 13 यांनी 15 ऑक्टोबर 1582 पासून केली. त्याआधी रोमचा राजा नुमा पॉम्पिलस याने रोमन कॅलेंडरमध्ये आवश्यक बदल केले आणि जानेवारी महिन्याचा समावेश कॅलेंडरमध्ये करण्यात आला आणि तो वर्षाचा पहिला महिना मानला गेला.
तर सध्या अनेक देशांमध्ये नववर्षाची सुरुवात झाली आहे, भारतही लवकरच नववर्षाचे स्वागत करेल. अशावेळी काही खास संदेश पाठवून तुम्ही तुमच्या मित्रपरिवाराला, शेजाऱ्यांना, आप्तेष्टांना नूतन वर्षाच्या शुभेच्छा देऊ शकता.
NEW YEAR
सरत्या वर्षाला निरोप देत
नवी स्वप्न, नव्या आशा, नवी उमेद व
नाविन्याची कास धरत नवीन वर्षाच स्वागत करू,
आपली सर्व स्वप्न, आशा, आकांशा पूर्ण होवोत
New Year
गेलं ते वर्ष आणि गेला तो काळ,
आता नवीन आशा अपेक्षा
घेवून आले नवीन साल,
सरत्या वर्षात झालेल्या चुका विसरुन जाण्याचा
प्रयत्न करुया.
नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
New Year
इतर दिवसांसारखाच असतो हा ही दिवस
तसाच उगवतो अन तसाच मावळतो…
तरीही त्यावर असतो नव्या नवतीचा तजेला ..
या दिवशी उगवणारा सूर्य घेऊन येतो
आशेच्या नव्या किरणांचा नजराणा..
त्यावर असते नवीन वर्षाची नव्हाळी
अन सोनेरी स्वप्नांची झळाळी ..
म्हणूनच इतर दिवसांसारखाच
नसतो हा दिवस.
तो असतो नव्या वर्षाचा आरंभ !
नव्या स्वप्नांचा प्रारंभ !!
पुन्हा एक नविन वर्ष, पुन्हा एक नवी आशा,
तुमच्या कर्तृत्वाला पुन्हा एक नवी दिशा,
सोबत माझ्या नव्या शुभेच्छा
New Year
पाकळी पाकळी भिजावी,
अलवार त्या दवाने ..
फुलांचेही व्हावे गाणे
असे जावो वर्ष नवे !!
वर्ष नवे !!
नव्या या वर्षी..
संस्कृती आपली जपूया ..
थोरांच्या चरणी एकदा तरी
मस्तक आपले झुकवू या ...
NEW YEAR
गतवर्षीच्या …
फुलाच्या पाकळ्या वेचून घे..
बिजलेली आसवे झेलून घे…
सुख दुःख झोळीत साठवून घे…
आता उधळ हे सारे आकाशी ..
नव्या कल्पना, नव्या भराऱ्या,
झेप घेऊया क्षितिजावर
उंच उंच ध्येयाची शिखरे,
गगनाला घालूया गवसणी,
हाती येतील सुंदर तारे,
नववर्षाच्या सुरवातीला मनासारखे घडेल सारे
NEW YEAR
आज वर्षाचा शेवटचा दिवस ..
खूप काही गमावलं पण ..
त्यापेक्षा अजून कमावलं ..
अगदी हृदयाजवळची माणसे दूर झाली,
तितकीच लोक जवळसुद्धा आली ..
खूप काही सोसलं .. खूप काही अनुभवलं!
केलेल्या संघर्षांतून जीवन कास जगायचं
हे शिकलो…
धन्यवाद मित्रांनो देत असलेल्या साथीबद्दल !!
माझ्या सर्व मित्रांची साथ, नातेवाईकांची साथ,
गुरुजनांचे मार्गदर्शन आणि
लहान थोरांचे आशीर्वाद
असेच दिवसेंदिवस लाभो…
नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!!!स्वप्न नवे !!
दुःख सारी विसरून जावू ..
सुख देवाच्या चरणी वाहू…
स्वप्ने उरलेली.. नव्या या वर्षी
नव्या नजरेने नव्याने पाहू…
NEW YEAR
प्रत्येक वर्ष कसं पुस्तकासारखंच असतं ना
३६५ दिवसांचं!!
जसं नवं पान पलटू.. तसं नवं मिळत जातं..
कधी मनामध्ये राहिलेलं पूर्ण होऊन जातं..
नवं पान, नवा दिवस, नवी स्वप्नं, नवी ध्येयं,
नव्या आशा, नव्या दिशा, नवी माणसं,
नवी नाती, नवं यश, नवा आनंद.
कधी अपूर्ण, कधी संपूर्ण,
नवा हर्ष, नवं वर्ष…!
या सुंदर वर्षासाठी
बघता बघता डिसेंबर महिना संपत आला..
एक वर्ष कसं गेलं ते कळलंच नाही,
असो ते संपणारच..
आपण या वर्षात माझ्या सुखात दुःखात माझ्या
बरोबर उभे राहिलात,
याबद्दल मी तुमचा आभारी आहे..
या वर्षात माझ्याकडून कळत नकळत
कोणाचे मन दुखले असेल तर
मला मोठ्या मनाने माफ करा..
आणि पुढेही असेच आयुष्यभर माझ्यावर
तुमचे प्रेम असु द्या…
नवीन वर्षाच्या लाख लाख शुभेच्छा
जे जे हवे तुम्हाला ते ते मिळू दे,
भाग्यवान या शब्दाचा अर्थ
तुमच्याकडे पाहुन कळु दे,
शिखरे यशाची सर तुम्ही करावी,
पाहता वळूनि मागे शुभेच्छा माझी स्मरावी,
तुमच्या आनंदाचा वेल गगनाला भिडू दे,
आयुष्यात तुमच्या सर्व काही
मनासारखे घडू दे…
NEW YEAR
उद्या तुमच्यावर अनेकांकडून
शुभेच्छांचा वर्षाव होईल..
त्या घाईगडबडीत तुमचे माझ्या शुभेच्छांकडे
लक्ष असेल-नसेल म्हणून,
आजच एक दिवस आधी मी माझ्याकडून व
माझ्या परिवाराकडून,
तुम्हाला व तुमच्या परिवाराला नवीन वर्षाच्या
हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो..
नवीन वर्ष हे तुम्हाला आनंदाचे, भरभराटीचे,
वैभवाचे, आरोग्यदायक,
आणि मंगलमय जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना
पुन्हा नववर्षाचे स्वागत करूया
गतवर्षाची गोळाबेरीज करूया
चांगले तेवढे जवळ ठेऊन
वाईट वजा करूया नवे संकल्प,
नव्या आशा पुन्हा पल्लवित करूया
NEW YEAR
नमस्कार
तुमचे CREATION9 या आपल्या वेबसाईट वर स्वागत आहे.
Connect With Us
Category
विचार
* महत्त्वाच्या लिंक्स
धन्यवाद
- abaashishb7
- March 6, 2023
- 1:23 pm