💖 होळी आणि रंगपंचमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा 💖
HOLI

फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी येणारा होळी हा सण भारतामध्ये, विशेषतः उत्तर भारतामध्ये उत्साहाने साजरा होणारा एक सण आहे. होळी या उत्सवाला होळी पौर्णिमा, होलिकोत्सव, होलिकादहन, अशी विविध नावे आहेत. ह्या उत्सवाला "होलिकादहन" किंवा "होळी", "शिमगा", "हुताशनी महोत्सव", फाग, फागुन "दोलायात्रा", "कामदहन" अशा वेगवेगळ्या संज्ञा आहेत. कोकणात शिमगो म्हणतात. फाल्गुन महिन्याच्या शेवटच्या दिवशी साजरा होणाऱ्या ह्या लोकोत्सवाला "फाल्गुनोत्सव",आणि दुसऱ्या दिवशी सुरू होणाऱ्या वसंत ऋतूच्या आगमनानिमित्त "वसंतागमनोत्सव" किंवा "वसंतोत्सव" असेही म्हणण्यात येते. देशीनाममाला या ग्रंथात हेमचंद्र याने या सणालाला सुग्रीष्मक असे नाव दिले आहे.यातूनच शिमगाअसा अपभ्रंश तयार झाला असावा असे मानले जाते. महाराष्ट्रात होळीच्या दिवशी समिधा म्हणून काही लाकडे मंत्रोच्चारात जाळतात येतात, आणि पेटलेल्या होळीभोवती 'बोंबा' मारत लोक प्रदक्षिणा घालतात. होळीला नारळ अर्पण करून नैवेद्य दाखवतात. महाराष्ट्रात पुरणपोळीचा नैवेद्य दाखविण्याची रीत आहे. होळी नंतर ५ दिवसांनी रंगपंचमी हा सण साजरा केला जातो.होळीच्या दुसऱ्या दिवशी धूलिवंदनाचा सण साजरा केला जातो. याला 'धुळवड' असेही म्हणतात. या दिवशी होळीची रक्षा अंगाला फासली जाते किंवा ओल्या मातीत लोळण घेतली जाते. एकमेकांना गुलाल लावून रंगांची उधळण करणे, सर्वांनी एकत्र येणे, बंधुभाव आणि एकतेचे प्रतीक म्हणून याकडे पहिले जाते.

रंगपंचमी हा एक सण आहे. फाल्गुन कृष्ण पंचमी या तिथीला रंगपंचमी हा सण साजरा केला जातो. धुलिवंदनापासून सुरू होणाऱ्या वसंतोत्सवाला रंगपंचमीच्या दिवशी पाच दिवस पूर्ण होतात.म्हणजे रंगांचा सण. या दिवशी एकमेकांंना वेगवेगळे रंंग लावून आनंंदोत्सव साजरा केला जातो. द्वापरयुगात गोकुळात बाल/कुमार कृष्ण आपल्या गोपाळ सवंगड्यांवर पिचकारीने रंगीत पाणी उडवीत असे व उन्हाची तलखी कमी करीत असे. तीच प्रथा आजही रंगपंचमीच्या रूपाने चालू आहे. मध्ययुगात संस्थानिक, राजे हे होळी आणि रंगपंचमी सण साजरा करीत असत. राधा आणि कृष्ण यांनी या दिवशी एकत्र रंग खेळण्याचा आनंद घेतला अशी धारणा आहे. या दिवशी कृष्णासह राधेची पूजाही केली जाते. रंगपंचमी हा वसंत ऋुतुशी संबंधित महत्त्वाचा सण आहे. उन्हाळ्याच्या सुरुवातीला हा सण साजरा केला जातो. उन्हाचा तडाखा कमी व्हावा आणि थंडावा मिळावा यासाठी एकमेकांच्या अंगावर पाणी उडविण्याची रीत आहे.

HOLI

होळीच्या या पावित्र अग्नी मध्ये निराशा,

दारिद्रय, आळस यांचे दहन होवो

आणि सर्वांच्या आयुष्यात आनंद, सुख,

आरोग्य शांती नांदो.

होळी पोर्णिमा निमित्त हार्दिक शुभेच्छा.

Holi

जुने हेवेदावे जुनी भांडणे

होळी मध्ये टाकूया,

विसरून जाऊ द्वेष आणि सारे नातेसंबंध

राखूया.

होळी पेटू दे

द्वेष जळू दे

अवघ्या जीवनात

नवे रंग भरू दे

होळीच्या सर्वांना शुभेच्छा

Holi

फाल्गुन पौर्णिमेला येते होळी

नैवेद्याला पुरणपोळी

देता जोरात आरोळी

राख लाऊ कपाळी

होळीच्या हार्दिक शुभेच्छा

HOLI

होळी हा भारतातील लोकप्रिय सण आहे.

हा सण दरवर्षी फाल्गुन महिन्याला

साजरा केला जातो

होळीला हुताशनी पोर्णिमा किंवा शिमगा

असेही म्हणतात.

होळी हा हर्षाचा, उत्साहाचा आणि रंगांचा

सण आहे.

होळीच करायची तर

अहंकाराची, असत्याची, अन्यायाची,

जातीभेदाची, धर्मवादाची, हुंडा प्रथेची,

भ्रष्टाचाराची, निंदेची, आळसाची, गर्वाची,

दुःखाची होळी करू

होळीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.

HOLI

दहन व्हावे वादाचे,

पुजावे श्रीफळ संवादाचे,

नात्यात यावा गोडवा पुरणपोळीचा

आनंद घेऊन येई सण हा होळीचा

तनामनावर उमटले आज रंगांचे तरंग

रंगपंचमी घेऊन आली आज विविधतेचा संग

उधळु मुक्त भावना आज रंगांच्या समवे

परस्परावर प्रीत जडावी, विसरू रुसवे फुगवे

होळीच्या हार्दीक शुभेच्छा.

HOLI

होळी दरवर्षी येते आणि सर्वांना रंगवून जाते,

ते रंग निघून जातात

पण तुमच्या प्रेमाचा रंग तसाच राहतो.

होळी धूलिवंदन च्या तुम्हाला आणि तुमच्या

परिवाराला हार्दिक शुभेच्छा.

वसंताच्या आगमनासाठी

वृक्ष नटले आहेत,

जुनी पाने गाळून,

नवीन पालवी मिरवीत,

रंगांची उधळण करीत,

जुने नको ते होळीत टाकून

तुम्हीही रंगा रंगार रंगून

होळी आणि रंगपंचमी च्या हार्दिक शुभेच्छा

HOLI

रंग साठले मनी अंतरी

उधळू त्यांना नभी चला

आला आला रंगोत्सव

हा आला तुम्हाला होळीच्या रंगीत शुभेच्छा

Holi

प्रेम रंगाने भरा पिचकारी

आपुलकी चे सारे रंग उधळू द्या जगी

या रंगांना माहीत नाही ना जाती ना बोली

सर्वांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा.

रंगारंगाचा सण हा आला

होळी पेटता उठल्या ज्वाला

दुष्ट प्रवृत्तीचा अंत झाला

सण आनंदाने साजरा केला

होळीच्या हार्दिक शुभेच्छा.

HOLI

सुरक्षेच भान राखू

शुध्द रंग उधळू माखू

रासायन, घाण नको मळी रे

आज वर्षाची होळी आली रे

राग, द्वेष, मतभेद विसरू

प्रेम, शांती चहूकडे पसरवू

होळी ईडापीडा दुःख जाळी रे

आज वर्षाची होळी आली रे.

होळीच्या हार्दिक शुभेच्छा

Holi

रंग जाणती जात ना भाषा

उधळण करूया चढू दे प्रेमाची नशामैत्री

अन नात्यांचे भरलेले तळे

भिजूनी फुलवूया प्रेम रंगाचे मळे

होळीच्या रंगमय शुभेच्छा.

जीवनाच्या वाटेवर

पुन्हा मागे वळून पाहू.

सोडून गेल्या क्षणांना

आठवणीत जपुन ठेऊ.

उरले सुरले क्षण जेवढे

आनंदाने जगत जाऊ.

रंगात रंगून होळीच्या

हर्ष उधळत राहू.

HOLI

खमंग पुरणपोळी चा बेत

ठरला घरोघरी

रंगांनी न्हाऊन गेली ही दुनिया सारी

नियम पाळून करूया होळी साजरी

होळीच्या रंगमय शुभेच्छा.

HOLI

रंगबिरंगी रंगांचा सण हा आला,

होळी पेटता उठल्या ज्वाळा,

दुष्ट वृत्तीचा अंत हा झाला,

सण आनंदे हा साजरा केला.

नमस्कार
तुमचे CREATION9 या आपल्या वेबसाईट वर स्वागत आहे.

Connect With Us

HOME
का करावे??

Category

विचार

* महत्त्वाच्या लिंक्स

💖धन्यवाद💖