- abaashishb7
- March 6, 2023
- 1:17 pm
💖दिवाळीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा💖
Diwali
दिवाळी एक प्रमुख हिंदु सण आहे. हा दीपोत्सव भारतात सर्वत्र साजरा होतो. या सणाला घरात व घराबाहेर तेलाचे लहान दिवे लावले जातात. उंच जागी आकाशदिवा (आकाशकंदिल) लावला जातो. घराबाहेर रांगोळी काढून सुशोभन केले जाते. पावसाळा संपून नवीन पिके हाती आल्यानंतर शरद ऋतूच्या ऐन मध्यभागी, अश्विन व कार्तिक या महिन्यांच्या संधिकालात हा सण येतो. आश्विन वद्य द्वादशी ते कार्तिक शुद्ध द्वितीया हे सहा दिवस या सणाचे असतात. हा सण साधारणपणे ऑक्टोबर - नोव्हेंबर दरम्यान येत असतो. या सणाला भारतात बहुतांश ठिकाणी सुटी असते. हा एक पवित्र हिंदु सण आहे जो वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतिक आहे.
Diwali
वसुबारस
अश्विन कृष्ण द्वादशीस म्हणजेच गोवत्सद्वादशीस, वसुबारस हा सण साजरा केला जातो. वसुबारस ह्याचा अर्थ-वसु म्हणजे द्रव्य (धन) त्यासाठी असलेली बारस म्हणजे द्वादशी या दिवसाला गोवत्स द्वादशी असेही म्हणतात. भारताची संस्कृती कृषीप्रधान असल्याने या दिवसाचे महत्त्व विशेष आहे. या दिवशी संध्याकाळी गाईची पाडसासह पूजा करतात. घरांत लक्ष्मी मातेचे आगमन व्हावे या हेतूनेही या दिवशी सवत्स धेनुची पूजा करण्याची पद्धत आहे. ज्यांच्याकडे घरी गुरे, वासरे आहेत त्यांच्याकडे ह्या दिवशी पुरणाचा स्वयंपाक करतात. घरातील सवाष्ण बायका गाईच्या पायावर पाणी घालतात. नंतर हळद-कुंकू, फुले, अक्षता वाहून फुलांची माळ त्यांच्या गळ्यात घालतात. निरांजनाने ओवाळून केळीच्या पानावर पुरणपोळी वगैरे पदार्थ वाढून गाईला खाऊ घालतात. ह्या दिवसापासून अंगणात रांगोळी काढण्यास सुरुवात होते. पुष्कळ स्त्रियांचा या दिवशी उपवास असतो. ह्या दिवशी गहु, मुग खात नाहीत. स्त्रिया बाजरीची भाकरी व गवारीच्या शेंगांची भाजी खाऊन उपवास सोडतात. आपल्या मुला-बाळांना चांगले आरोग्य मिळावे व सुख लाभावे म्हणून ही पूजा असते.
Diwali
धनत्रोयदशी
आयुर्वेदाच्या दृष्टीने हा दिवस धन्वंतरी जयंतीचा आहे. वैद्य मंडळी या दिवशी धन्वंतरीची (देवांचा वैद्य) पूजा करतात. लोकांस प्रसाद म्हणून कडुनिंबाच्या पानांचे बारीक केलेले तुकडे व साखर असे लोकांना देतात. (याला तेलुगूमध्ये गुडोदकम् म्हणतात.) यात मोठा अर्थ आहे, धन्वंतरी हा अमृतत्त्व देणारा आहे, हे त्यातून प्रतीत होते. कडुनिंबाची पाच-सहा पाने जर रोज खाल्ली तर व्याधी होण्याचा संभव नाही, असे काहीजणांची समजूत आहे. कडुनिंबाचे एवढे महत्त्व आहे, म्हणून या दिवशी तोच धन्वंतरीचा प्रसाद म्हणून देण्यात येतो. या दिवशी वस्त्रालंकार खरेदी करणे शुभ मानतात. उपवास करून घरातले द्रव्य व अलंकार पेटीतून काढून ते साफसूफ करतात. कुबेर, विष्णू -लक्ष्मी, योगिनी, गणेश, नाग आणि द्रव्यनिधी यांची पूजा करून पायसाचा नैवेद्य दाखवितात.हा दिवस भारतात राष्ट्रीय आयुर्वेद दिवस म्हणूनही साजरा होतो.
Diwali
नरक चतुर्दशी
नरक चतुर्दशी या सणाशी संबंधित नरकासुरवधाची आख्यायिका प्रचलित आहे. या दिवशी कृष्णाने नरकासुराचा वध करून प्रजेला त्याच्या जुलुमी राजवटीतून सोडवले. नरकासुराने तप करून ब्रम्हदेवाला प्रसन्न करून घेतले व अवध्यत्वाचा - म्हणजेच कुणाकडूनही वध होणार नाही - असा वर मागून घेतला. त्या वराच्या योगाने त्याने अनेक राजांना हरवून त्यांच्या कन्या व त्या राज्यांतील स्त्रियांचे अपहरण केले. नरकासुराने अश्या एकूण १६,१०० स्त्रियांना पळवून नेले व मणिपर्वतावर एक नगर वसवून त्यात त्यांना बंदी बनवून ठेवले. त्याने अगणित संपत्ती लुटली व अश्याच हावेपोटी त्याने देवमाता अदितीची कुंडले व वरूणाचे विशाल छत्रही बळकावले. त्याला मिळालेल्या वरामुळे तो देव, गंधर्व व मानवांना तापदायक झाला होता. अनेक गिरिदुर्गांनी वेढलेले प्राग्ज्योतिषपूर हे नगर त्याची राजधानी होती. ही राजधानी अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या खंदकांनी, अग्नी, पाणी इत्यादींनी वेढलेली होती. या दुर्जय राजधानीवर कृष्णाने गरुडावर स्वार होऊन चाल केली. कृष्णाने नरकासुराच्या देहाचे दोन तुकडे करत त्याचा वध केला. नरकासुरवधाने देवादिकांना, तसेच प्रजेला आनंद झाला. नरकासुराच्या बंदिवासातील कुमारिकांना त्यांचे स्वजन स्वीकारणार नाहीत, हे जाणून कृष्णाने या १६,१०० कन्यांसोबत विवाह केला व त्यांना सामाजिक प्रतिष्ठा मिळवून दिली. कृष्णाच्या पराक्रमाचे स्मरण म्हणून अश्विन कृष्ण चतुर्दशी च्या दिवशी नरक चतुर्दशी हा सण साजरा केला जातो. या दिवशी अभ्यंगस्नानाचे महत्त्व असते. सकाळी लवकर उठून, संपूर्ण शरीरास तेलाचे मर्दन करून, सुवासिक उटणे लावून, सूर्योदयापूर्वी केलेले स्नान म्हणजे अभ्यंगस्नान. या दिवशी पहाटे यमासाठी नरकात म्हणजे आधुनिक परिभाषेत घरातील आदल्या दिवशी घासून पुसून स्वच्छ केलेल्या स्वच्छतागृहात पणती लावण्याची प्रथा आहे.
Diwali
लक्ष्मीपुजन
आश्विन अमावास्येस लक्ष्मीपुजन केले जाते. या दिवशी प्रदोषकाळी (संध्याकाळी) लक्ष्मीचे पूजन केले जाते. लक्ष्मी ही फार चंचल असते असा समज आहे. त्यामुळे, शक्यतोवर हिंदू शास्त्राप्रमाणे लक्ष्मीपूजन हे, लक्ष्मी स्थिर रहावी म्हणून, स्थिर लग्नावर करतात. त्याने लक्ष्मी स्थिर राहते असा समज आहे. अनेक घरांत श्रीसूक्तपठणही केले जाते. व्यापारी लोकांचे हिशोबाचे नवीन वर्ष (विक्रमसंवत्) लक्ष्मीपूजनानंतर सुरू होते. या दिवशी सर्व अभ्यंग स्नान करतात. पाटावर रांगोळी काढून तांदूळ ठेवतात. त्यावर वाटी किंवा तबक ठेवतात. त्यात सोन्याचे दागिने, चांदीचा रुपया, दागिने ठेवून त्यांची पूजा करतात. महाराष्ट्रात लक्ष्मी पूजनाला भेंड, बत्तासे, साळीच्या लाह्यांचा नेवैद्य दाखवण्याची पद्धत आहे. हा दिवस व्यापारी लोक फार उत्साहात साजरा करतात. या दिवशी लोक स्वच्छता करण्यासाठी लागणारी नवी केरसुणी विकत घेतात. तीलाच लक्ष्मी मानून तिच्यावर पाणी घालून हळद-कुंकू वाहून घरात वापरण्यास सुरुवात करतात. केरसुणीने घर स्वच्छ होवून घरातील अलक्ष्मी म्हणजे दारिद्य्र दूर होते असे मानले जाते.
Diwali
बलिप्रतिपदा
कार्तिक शुद्ध प्रतिपदेस बलिप्रतिपदा हा सण साजरा केला जातो. हा दिवस दिवाळी पाडवा म्हणून ही ओळखतात, या दिवशी बळी राजाचे रांगोळीने चित्र काढतात व त्याची पूजा करतात आणि 'इडा पीडा टळो व बळीचे राज्य येवो' असे म्हणतात. साडेतीन मुहूर्तातील एक मुहूर्त म्हणून या दिवसाला विशेष महत्त्व आहे. शेतकरी पहाटे स्नान करून डोक्यावर घोंगडी घेतात व एका मडक्यात कणकेचा पेटता दिवा घेऊन शेतात जातात व ते मडके शेताच्या बांधावर खड्डा करून पुरतात. काही ठिकाणी बळीची अश्वारूढ प्रतिमा करून तिची पूजा केली जाते. शेणाचा बळीराजा करण्याची प्रथाही अस्तित्वात आहे. या शेणाला "शुभा" असे म्हणतात. असा हा लोककल्याणकारी राजा बळी, त्याच्या पूजनाचा दिवस. या दिवशी विक्रम संवत सुरू होतो. पाडवा हा साडेतीन मुहूर्तापैकी हा एक मुहूर्त आहे. आर्थिक हिशोबाच्या दृष्टीने व्यापारी लोक दिवाळीतील पाडवा ही नववर्षाची सुरुवात मानतात. लक्ष्मीप्राप्तीसाठी नव्या वह्यांचे पूजन करून व्यापारी लोक वर्षाचा प्रारंभ करतात. व्यापारी लोकांच्या जमा-खर्चाच्या कीर्द-खतावणीच्या नवीन वह्या ह्या दिवशी सुरू होतोत. नवीन वह्या सुरू करण्यापूर्वी वह्यांना हळद-कुंकू, गंध, फूल, अक्षता वाहून पूजा करतात. व्यापारी या दिवशी मुहूर्ताने व्यवहार सुद्धा करतात. घरोघरी सायंकाळी पाटाभोवती रांगोळी काढून पत्नी पतीला औक्षण करते व पती पत्नीला ओवाळणी घालतो. नवविवाहित दांपत्याची पहिली दिवाळी पत्नीच्या माहेरी साजरी करतात. ह्यालाच "दिवाळसण" म्हणतात. त्यानिमित्त यादिवशी जावयास आहेर करतात. दक्षिण भारतात या दिवशी बलीची प्रतिमा तयार करून ती गोठ्यात ठेवतात व तिची पूजा करतात. गायी - बैलांना रंग लावून रंग लावून व माळा लावून सजवतात. पाताणे प्रभू (पाठारे प्रभू) लोकांत बळीची अश्वारूढ प्रतिमा उंच जागी उभी करून तिच्या भोवती एकवीस दिवे मांडण्याचीही चाल आहे.
Diwali
गोवर्धन पुजा
मथुरेकडील लोक बलिप्रतिपदेच्या दिवशी सकाळी गोवर्धन पर्वताची पूजा करतात. ते ज्यांना शक्य नसेल ते गोवर्धनाची प्रतिकृती करून त्याची पूजा करतात. अन्नकूट म्हणजे वास्तवात गोवर्धनाची पूजा होय. प्राचीन काळी हा उत्सव इंद्राप्रीत्यर्थ होत असे. पण वैष्णव संप्रदाय बलवान झाल्यावर इंद्रपूजेचे रूपांतर गोवर्धनपूजेत झाले. विविध प्रकारची पक्वान्ने आणि खाद्य पदार्थ तयार करून ते कृष्णाच्या मूर्तीच्या पुढे मांडणे व कृष्णाला त्याचा नैवेद्य दाखविणे याला अन्नकूट म्हणतात.
Diwali
भाऊबीज
कार्तिक शुद्ध द्वितीयेस भाऊबीज हा सण साजरा केला जातो. या दिवशी यम आपली बहीण यमी हिच्या घरी जेवायला गेला म्हणून या दिवसाला "यमद्वितीया" असे नाव मिळाले असे मानले जाते. बंधु-भगिनींचा प्रेमसंवर्धनाचा हा दिवस आहे. या दिवशी बहिणीच्या घरी भाऊ गोडधोड भोजन करतो आणि सायंकाळी चंद्राची कोर दिसल्यानंतर बहीण प्रथम चंद्रकोरीस व नंतर भावाला ओवाळते. भाऊ मग ओवाळणीच्या ताटात ओवाळणी देऊन बहिणीचा सत्कार करतो. भावा-बहिणीच्या नात्याचा एक तरी सण प्रत्येक समाजात असतोच.
Diwali
दिवाळीचा पहिला दिवा लागता दारी,
सुखाचे किरण येती घरी,
पुर्ण होवोत तुमच्या सर्व इच्छा,
आमच्याकडून दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा...
अंधारवाटा उजळून निघाल्या
दिपावलीच्या या दिनी
सदैव मंगल होवो सर्वांचे
हीच कामना मनी.
Diwali
दिपावलीच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा.
लक्ष्मीच्या सोनपावलांनी आपल्या घरात
सुख समृद्धी आणि आनंद येवो.
अंधकार दूर करून सर्वांचे आयुष्य
आपल्या तेजाने उजळून टाकणार्या
DIWALI
स्नेहाचा सुगंध दरवळला..
आनंदाचा सण आला..
एकच मागणे दिवाळी सणाला..
सौख्य, समृद्धी लाभो सर्वांना
तेजोमय झाला आजचा प्रकाश,
जुना कालचा काळोख,
लुकलुकणार्ऱ्या चांदण्याला किरणांचा
सोनेरी अभिषेक
सारे रोजचे तरीही भासे नवा सहवास,
सोन्यासारख्या लोकांसाठी खास.
DIWALI
आकाशकंदील अन पणत्यांची
रोषणाई, फराळाची लज्जत न्यारी,
नव्या नवलाईची ही दिवाळी,
झगमगली दुनिया सारी
दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा
DIWALI
चंद्राचा कंदील घरावरी,
चांदण्याचे तोरण दारावरी,
क्षितिजाचे रंग रांगोळीवरी,
दिवाळी चे स्वागत घरोघरी.
DIWALI
झगमगत्या दिव्यांनी
प्रकाशित दिवाळी
आली अंगणी,
धनधान्य सुख समृद्धी
आणि ईश्वराचा आशिर्वाद घेऊन
आली ही दिवाळी
DIWALI
उटण्याचा सुगंध, रांगोळीचा थाट, दिव्यांची आरास
फराळाचे ताट, फटाक्यांची आतिषबाजी,
आनंदाची लाट,
नुतन वर्षाची चाहुल दिवाळी पहाट..धन्वंतरी आपणावर सदैव प्रसन्न असो
निरामय आरोग्यदायी जीवन आपणास लाभो
धनवर्षाव आपणाकडे अखंडित होवो
ही दिवाळी आपणा सर्वांस आनंदाची
आणि भरभराटीची जावो.
DIWALI
आज धनत्रयोदशी
धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, धैर्यलक्ष्मी, शौर्यलक्ष्मी,
विद्यालक्ष्मी, कार्यलक्ष्मी, विजयालक्ष्मी,
राजलक्ष्मी
या दिपावलीत या अष्टलक्ष्मी तुमच्यावर
धनाचा वर्षाव करो,
ही दिवाळी तुम्हाला आणि
तुमच्या संपुर्ण कुटुंबीयांना
सुखाची, समृद्धी ची व भरभराटीची जावो..
DIWALI
तुमच्या घरी लक्ष्मी चा सदैव वास असो
तुमच्या जीवनात दुःखाची काळी छाया नसो
आप्तेष्टांची सदैव साथ असो
यंदाची धनत्रयोदशी तुमच्यासाठी खास असो.
धन्वंतरी ची कृपा दृष्टी तुमच्यावर सदैव राहो
निरोगी, आनंददायी जीवन आपणास लाभो
ही दिवाळी आपणास सुखाची, समृद्धची आणि
भरभराटीची जाओ.
धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा
दिवाळीच्या मुहूर्ती अंगणी भाग्यलक्ष्मीची स्वारी
सुख समाधान, आरोग्य आणि धनसंपदा,
गुंफून हात हाती, तुमच्या दारी यावी
लक्ष्मीपूजनाच्या हार्दिक शुभेच्छा.
DIWALI
महालक्ष्मी चे करूनी पूजन लावा दीप अंगणी,
धन धान्य सुख समृद्धी लाभेल तुम्हा जीवनी...
मंगलदायक उत्सवात या शुभेच्छा जपा मनी...
स्वदुग्धे सदा पोशिते जी जगाला
स्वपुत्रास दे जी कृषी चालवाया
परमपूज्य जी वंद्य या भारताला
नमस्कार त्या दिव्य गो देवतेला
वसुबारस
गाय आणि वासराच्या अंगी असणारी उदारता,
प्रसन्नता, शांतता आणि समृद्धी आपणास लाभो
ही दिवाळी तुम्हा सर्वांना सुख समृद्धी
आणि भरभराटीची जावो.
स्नेहाच्या दिव्यात तेवते वात तेजाची,
वसुबारस म्हणजे पुजा धेनु वासराची
दिवाळीचा पहिला दिवस
वसुबारस निमित्त मंगलमय शुभेच्छा
बहिणीची असते भावावर अतुट माया
मिळो त्याला नेहमी अशीच प्रेमाची छाया,
भावाची असते बहिणीला साथ,
मदतीला देतो नेहमीच हात
नरकासुराचा वध झाला नरकचतुर्दशीला
अभ्यंग स्नान करूनी स्मरावे श्रीकृष्णाला!!
दिवाळीचे हे दिवे लखलखते
उजळून टाकू दे बंध प्रेमाचे
चिरंतर राहो आपले नाते बहीण भावाचे
सत्याचा असत्यावर नेहमीच प्रभाव असावा
अन्यायाचा प्रतिकार करण्याचं बळ
आपल्याला लाभो
आपल्याकडून नेहमी सत्कर्म घडो
आपणास स्वर्गसुख नित्य लाभो ही
दिवाळी तुम्हा सर्वांना
सुख समृद्धी आणि भरभराटीची जावो.
नरक चतुर्दशी दिवसाच्या मंगलमय शुभेच्छा.
अंगणात उभारला विवाह मंडप,
त्यात सजली ऊस आणि
झेंडूच्या फुलांची आरास,
तुळशी विवाह साजरा करूया आपण,
कारण आज दिवस आहे खास.
ऊसाचे मांडव सजवूया आपण,
विष्णु तुळशीचे लग्न लावूया आपण,
तुम्हीही व्हा आमच्या आनंदात सामील,
मोठ्या थाटात तुळशी विवाह करूया आपण
ज्या अंगणात तुळस आहे
ती तुळस खुप महान आहे,
ज्या घरात असते ही तुळस
ते घर स्वर्गसमान आहे.
सुरक्षेचं कवच आणि पाठीवरचा हात,
बहिणींसाठी भाऊ म्हणजे दुःखावरची मात
भाऊबीजेच्या खुप खुप शुभेच्छा!!
भाऊबीजेच्या सणाचा उत्साह असाच कायम राहावा
अन प्रत्येक बहिणीच्या मागे एकतरी पहाडासारखा भाऊ असावा
भाऊबीजेच्या सणाचा उत्साह
असाच कायम राहावा
अन प्रत्येक बहिणीच्या मागे
एकतरी पहाडासारखा भाऊ असावा
नमस्कार
तुमचे CREATION9 या आपल्या वेबसाईट वर स्वागत आहे.
Connect With Us
Category
विचार
* महत्त्वाच्या लिंक्स
💖धन्यवाद💖
- abaashishb7
- March 6, 2023
- 1:17 pm