- abaashishb7
- March 6, 2023
- 1:20 pm
💖गुढीपाडव्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा💖
Gudhipadwa
गुढीपाडवा हा भारतातील विशेषत: महाराष्ट्रातील प्रमुख सण आहे. हा सण हिंदु दिनदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला साजरा केला जातो आणि हा दिवस शालीवाहन संवत्सराचा पहिला दिवस आहे. वेदांग ज्योतिष या ग्रंथात सांगितलेल्या साडेतीन मुहूर्तापैकी हा एक मुहूर्त आहे. या दिवशी नवीन वस्तू खरेदी, व्यवसाय प्रारंभ, नव उपक्रमांचा प्रारंभ, सुवर्ण खरेदी इत्यादी गोष्टी केल्या जातात. दारी उभारलेली गुढी हे विजय आणि समृद्धीचे प्रतीक आहे असे मानले जाते. गुढीपाडव्यापासूनच राम जन्मोत्सवाच्या कार्यक्रमाचासुद्धा प्रारंभ होतो.
नेसून साडी माळून गजरा
उभी राहिली गुढी,
नव वर्षाच्या स्वागताची
गुढीपाडव्याच्या मंगलमय शुभेच्छा.
चैतन्यमय झाला सारा परिसर
नव्या पालवीने
गुढीपाडव्याच्या निमित्ताने नववर्षाची सुरुवात करू
पुन्हा सकारात्मकतेने
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा.
कलश बत्ताश्यांनी सजवा गुढी
कायम जतन करा आपल्या परंपरा आणि रूढी
एकमेकांबद्दल मनात ठेवू नका कुठलीही अढी
नववर्षाच्या स्वागतासाठी उंचच उंच
उभारूया ही गुढी
Gudhipadwa
सोनेरी पहाट उंच गुढीचा थाट
आनंदाची उधळण अन सुखांची बरसात
नव्या वर्षाची सोनेरी सुरवात...
गुढीपाडव्याच्या मनःपूर्वक शुभेच्छा.
वसंत ऋतूच्या आगमनी,
कोकिळा गाई मंजुळ गाणी...
नववर्ष आज शुभ दिनी,
सुख समृद्धी नांदो जीवनी...
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा.
Gudhipadwa
गुढी उभारू आनंदाची, समृद्धी ची,
आरोग्याची, समाधानाची आणि उत्तुंग यशाची.
नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
शुभ गुढीपाडवा.
समतेचे बांधू तोरण,
गुढी उभारू ऐक्याची,
स्वप्न आपुले साकारण्यासाठी
हार्दिक शुभेच्छा आजच्या शुभदिनी.
गुढीपाडव्याच्या मंगलमय शुभेच्छा.
नक्षीदार काठीवरी रेशमी वस्त्र,
त्याच्यावर चांदीचा लोटा,
उभारूनी मराठी मनाची गुढी,
साजरा करूया हा गुढीपाडवा.
गुढी प्रेमाचे उभारूया मनी
औचित्य शुभमुहूर्ताचे करूनी
विसरूनी जाऊ दुःख सारे
स्वागत करूया नववर्षाचे प्रेमभरे...
Gudhipadwa
ऋतूने बदलतं हिंदू वर्ष
नववर्ष येताच येते बहार..
सगळीकडे दिसतो हा सुंदर बदल.,
अस असतं नववर्षाचे हे पर्व.
"सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे,
सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस..
सोनेरी दिवसाच्या सोनेरी शुभेच्छा सोन्यासारख्या लोकांना..गुडीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा"
सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस..
सोनेरी दिवसाच्या सोनेरी शुभेच्छा सोन्यासारख्या लोकांना..गुडीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा"
नमस्कार
तुमचे CREATION9 या आपल्या वेबसाईटवर स्वागत आहे.
Connect With Us
Category
विचार
* महत्त्वाच्या लिंक्स
💖धन्यवाद💖
- abaashishb7
- March 6, 2023
- 1:20 pm