Leave a Comment / Stories, बोधपर / By abaashishb7 abaashishb7 March 18, 2023 12:55 pm इच्छाWish एका गावात एक मोठ मंदिर असत, त्या मंदिरात देवांची पूजा करण्यासाठी एक पुजारी असतो. तो पुजारी रोज मनोभावे देवांची पूजा करत असतो, त्यामध्ये त्याचा एक स्वार्थ ही असतो तो म्हणजे त्याची अशी ईच्छा होती की त्याला एक लॉटरी लागावी , त्यामुळे तो दररोज देवासमोर एकदा लॉटरी लागावी अशी मागणी करत असतो. (Wish). Facebook Why?? एकेदिवशी तो पुजारी अचानक आजाराने मरण पावतो, मग तो स्वर्गात जातो. तिथे गेल्यानंतर खुप मोठी लाइन लागलेली असते, अचानक चित्रगुप्त ला मोठमोठ्याने ओरडण्याचा आवाज ऐकु येतो, जाउन बघतो तर तोच पुजारी जोरजोराने भांडत असतो त्याच्या भांडण्याचा आवाज देवा पर्यंत जातो. तेवढ्यात देव चित्रगुप्तांना त्या पुजार्याला घेऊन यायला सांगतो. देवा कडे गेल्यानंतर पण तो पुजारी ओरडणे चालुच ठेवतो, देव त्याला शांत करून काय झालं ते सविस्तर सांग अस म्हणतात! मग तो सर्व काही सांगतो की, मी तुझी खूप सेवा केली, खूप पूजा केली दररोज नैवेद्य दाखवला आणि तु माझी एक लॉटरी लागायची ईच्छा पुर्ण नाही करू शकलास. (Wish)अस म्हणताच देवाने त्याच्या एक जोरात मुस्काटात लावली, पुजारी म्हणाला काय झाल देवा मला का मारले, त्यावर देव म्हणाले अरे मूर्खा तुला लॉटरी लागण्यासाठी ते अगोदर तिकीट खरेदी कराव लागतं….!!!!तात्पर्य :- बरेच लोक त्यांच्या आयुष्यात खुप चांगल्या गोष्टी व्हाव्या अशी स्वप्न पाहत असतात, पण त्या गोष्टी मिळविण्यासाठी काहीही प्रयत्न न करता फक्त इच्छाच व्यक्त करत राहतात.