सावधानता
Cautions

Cautions

Cautions

जशा प्रकारे चांगल्या गोष्टी आहेत तशा वाईट गोष्टी देखील आहेत. पण आपण नेहमीच चांगल्या गोष्टी घडाव्या 

अशी ईच्छा करत असतो. आता तुम्ही विचार करत असाल यात काय नवीन आहे, सर्वांना हे माहीत आहे!!!!

तर म्हणणे असे आहे, बर्‍याच वेळा अस होत आपण एखाद्या अशा माणसांवर विश्वास ठेवतो की त्याच्या प्रत्येक 

गोष्टीत आपण नकळत सहभागी होतो आणि काही काळानंतर अस कळत आपण फसलो गेलोय ते मग 

आर्थिक दृष्ट्या असो की भावनिक दृष्ट्या. 

CAUTIONS

याचे एकमेव कारण म्हणजे निष्काळजीपणा, आपण काय करतो समोरच्याच्या कोणत्याही गोष्टीला नकळत 

दुजोरा देतो, त्यामुळे समोरचा आपला जास्त फायदा उचलायला बघतो. यावर उपाय म्हणजे समोरच्याला नीट 

पडताळून पाहणे, कामाची पद्धत जाणुन घेणे इत्यादी सारख्या गोष्टी.

आता नेटवर्क मार्केटिंग बाबत बोलु, इथे सुद्धा खुप सारे प्लॅटफॉर्म आहेत, खुप सार्‍या कंपनीज आहेत.

CAUTIONS

CAUTIONS

आपापल्या कंपनी ला Present करण्यासाठी खुप सारे लोक आहेत, पण आपण नेमके जायचे कुठे हा प्रश्न 

सुद्धा पडतो!!! 

त्यासाठी त्या कंपनी ची नीट माहिती घेणे, ती कंपनी Gov. रजिस्टर आहे की नाही हे तपासणे, त्यांचे मुख्य 

कार्यालय कुठे आहे हे बघणे,त्या कंपनी चा CIN No. जाणुन घेणे, त्यांची काम करण्याची पद्धत सुलभ आहे की 

नाही हे लक्षात घेणे थोडक्यात काय तर त्यांच्याबद्दल चे Review तपासणे. 

मग आपण त्यांच्यासोबत प्रामाणिकपणे काम करायला मोकळे होतो. कोणाच्याही बोलण्यावर जाऊ नये ही 

खबरदारी अवश्य घ्यावी.

इतर बाबतीत सांगायच झाल तर मध्यंतरी बँक बंद होऊन झालेल्या नुकसानीच्या खुप बातम्या येत होत्या 

त्यामुळे सार्‍याच बँकांवरती लोकांनी अविश्वास थोडीच दाखवला, आजही विश्वासावर बँक सोबत कामकाज 

सुरू आहे.

 

CAUTIONS

अजुन एक उदाहरण द्यायचे म्हटले तर घर, बिल्डींग बांधणारे बिल्डर बाबत फसवणुकीच्या बातम्या येतात पण 

याचा अर्थ असा अजिबात नाही की सर्वच बिल्डर जे की आपल्या कामामुळे प्रसिद्धी च्या मार्गावर चालत आहे ते 

सुद्धा असेच करतील. 

चांगल्या बिल्डर ची, त्याच्या कामाची आपण प्रशंसा केली पाहिजे त्याच प्रमाणे नेटवर्क मार्केटिंग मध्ये सुद्धा 

चांगल्या कंपनी ची आपण प्रशंसा केली पाहिजे.

सांगण्याचे तात्पर्य एवढेच आहे कोणाच्या बोलण्यावर, दिखाव्यावर न जाता सर्व गोष्टी तपासुन घेणे हीच आपली 

खबरदारी असेल.

अजुन कोणाला खबरदारी कशी घ्यावी हे सांगायचे असेल तर कमेन्ट करा आम्हालाही आपला प्रतिसाद पाहून 

आनंद होईल…

धन्यवाद.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *