सुरूवात (Start Up)

Start Up

START UP

सुंदरपूर नावाचे एक गाव होते, त्या गावचे एक वैशिष्ट्य होते तेथील लोक एकमेकांना मदत करत असत. 

असेच तिथे दोन चांगले मित्र राहत होते एकाच नाव होत अजय आणि दुसर्‍याच नाव होत रमेश त्या मित्रांमध्ये 

फरक फक्त एवढाच होता की अजय खुप महत्वाकांक्षी होता आणि रमेश महत्वाकांक्षी होता पण इतरांच्या 

सल्ल्यानुसार चालणारा होता. दोघांमध्ये चुरस लागलेली असायची की दोघांमध्ये कोण पुढे जाईल. त्या दोघांचे 

शिक्षण तसे जेमतेम होते. एक दिवशी दोघंजण बसलेले असतात, तेव्हा अजय रमेश ला म्हणतो आपण खुप 

मेहनत करत आहोत पण आपल्याला हवे तसे आयुष्य जगता नाही येत आहे त्यामुळे काहीतरी वेगळा विचार 

करावा लागेल म्हणुन आपण एक काम करायच एक चांगली युक्ती शोधुन आपण त्यावर काम करायचे आणि 

तेव्हा बघु कोण जास्त यशस्वी राहतो… यापुढे दोघांचे संभाषण.. Start Up

START UP

Facebook Why?? START UP

रमेश :- तुझ्याकडे कोणती कल्पना आहे का??

अजय :- अरे रमेश माझ्या डोक्यात एक कल्पना आली आहे….

रमेश :- बोल ना मित्रा.

अजय :- आपले आयुष्य एकदम चांगले होईल..

रमेश :- ते कसे??

अजय :- नीट ऐक, तर आपण एक म्हैस विकत घेऊ.

रमेश :- त्याने काय होईल, उगाच नसता खर्च नको रे!!!

अजय :- अरे पुर्ण ऐकुन तर घे…

रमेश :- हा बोल…

अजय :- हा तर आपण एक म्हैस विकत घेऊ तिचे संगोपन करून आपल्याला रोज दुध मिळेल ते दुध आपण 

             विकायच….

रमेश :- दुध विकून चांगले दिवस कसे येतील रे!!!!

अजय :- अरे तिथेच तर खरी मजा आहे, हे बघ आपण रोज दुध विकणार आणि ते विकून विकून वर्षभरात खुप सारा 

            पैसा साठवायचा आणि त्यातुन अजुन दोन म्हशी विकत घ्यायच्या…

रमेश :- परत….. दोन म्हशी??

अजय :- हो, त्या दोन्ही म्हशीचे असेच रोज दुध विकून अजुन म्हशी विकत घ्यायच्या आणि एक मोठा तबेला बांधायचा, 

            त्यात खुप म्हशी झाल्या की आपला व्यवसाय वाढायला सुरवात होईल…

रमेश :- अरे वाह खुपच छान युक्ती आहे पण, यात खुप वेळ जाईल रे आणि त्यासाठी खुप ऊर्जा वाया जाईल….

अजय :- अरे पण त्यामुळेच तर आपल्याला यश मिळेल… पुढे ऐक

रमेश :- बोल…..

अजय :- तबेला बांधला आणि आपला व्यवसाय वाढला की एक पोल्ट्रीफार्म विकत घ्यायची त्यामधून आणखी नफा 

            मिळेल मग त्यानंतर आपण नाही थांबायचे खुप पैसा येईल….

रमेश :- हो रे मेहनत तर करावीच लागेल आणि युक्ती पण छान आहे….

अजय :- चल मग लागु कामाला…

रमेश :- हो….

START UP

START UP

START UP

बोलून झाल्यावर दोघंही आपापल्या मार्गाने निघुन गेले…. रमेश खुप उत्साहित होऊन घरी गेला. घरी आल्यावर त्याच्या 

पत्नीने त्याला जेवायला वाढले आणि जेवता जेवता त्याने ही युक्ती आपल्या पत्नीला सांगितली…. तशी ती म्हणाली अहो 

पण त्या म्हशीला नीट सांभाळावी लागेल तिचे नीट संगोपन करावे लागेल आणि त्यामध्ये ती आजारी पडली आणि मेली 

तर!!!!!!???

अस म्हणताच रमेश सुद्धा विचारात पडला आणि खुप विचार करुन त्याने रोज चालु आहे तेच चालु ठेवले…. (Start-up )

काही वर्षांनंतर रमेश रस्त्यावरून सायकल ने जात असतो आणि त्याच्यापुढे एक मर्सिडीज येऊन थांबते आणि त्यामधून 

सुटा बुटात असलेला अजय उतरतो…. त्याला पाहुन रमेश अजयच्या जवळ जातो आणि त्याला विचारतो अरे अजय तु 

तर खुप मोठा माणूस झालास…. हे कसे झाले, त्यावर तो म्हणतो अरे विसरलास?? आपणच ठरवुन त्या युक्तिवर काम 

करायला सुरवात केली… त्यातूनच हे सगळे झाले…. तु सांग… त्यावर रमेश ने झालेल सगळं सांगितल….. आणि अजय 

म्हणाला तु जर स्वतः इतरांना न सांगता त्यावर नीट अंमलबजावणी केली असती तर चित्र फार वेगळे असले असते……  

Start-Up

START UP

तात्पर्य :- इतरांच्या सल्ल्यावर अवलंबुन न राहता स्वतःवर विश्वास ठेऊन पुढे जाण्यात शहाणपण आहे.

START UP

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *