- abaashishb7
- March 18, 2023
- 12:23 pm
नाविण्य
INNOVATION
INNOVATION
कल्पेश, सुधाकर, रवी, जावेद नावाचे चार मित्र होते ते एका विशालपूर नावाच्या गावत राहत होते, त्या गावात
2 किमी अंतरावर असलेल्या नदीवरून पाणी आणावे लागत असे, त्यामुळे ते चौघे त्या नदीवरून पाणी
आणण्याचे काम करत होते, त्यांच्याकडे सायकल होत्या त्यावरुन ते छोटे ड्रम भरून पाणी आणत आणि
गावातील लोकांना विकत असे. तोच त्यांच्या दिनक्रम असायचा आणि घर चालवायचा मार्ग सुद्धा.
असेच दिवस जात असतात आणि त्यांचे काम नेहमीप्रमाणे चालु असते पण त्यांच्या मनात एक गोष्ट नेहमी येत
असे की एवढी मेहनत करून सुद्धा त्यांना जेमतेम पैसे मिळत असे पण काही मार्ग सापडत नव्हता. पण
कल्पेश नदी पासुन गावात येण्याच्या मार्गाने निरीक्षण करत असतो, एके दिवशी कल्पेश त्या तिघांना म्हणतो
अरे आपण अस काय केल पाहिजे की आपली मेहनत काही प्रमाणात कमी झाली पाहिजे आणि पैसाही जास्त
मिळाला पाहिजे त्यावर सुधाकर म्हणतो हो ना मी पण तोच विचार करत होतो पण काहीच सुचत नाहीये.
सर्वजण माना नाही करून डोलावतात, तेवढ्यात कल्पेश म्हणतो माझ्याकडे एक Idea आहे पण थोडा खर्च
करावा लागेल. Innovation
आपण जर चौघे मिळुन जर या युक्तीवर काम केले तर कामही लवकर होईल, आपली मेहनत खुप प्रमाणात
वाचेल आणि महत्त्वाचे म्हणजे खर्चही कमी लागेल. हे ऐकुन तिघेजण उत्सुकतेने कल्पेश कडे बघतात, मग तो
सांगायला सुरवात करतो. तर Idea अशी आहे की इथुन नदी 2 किमी अंतरावर आहे आपण नदीच्या
एकाबाजूला जमिनीला लागुन एक छोटी टाकी बांधायची आणि अशी बांधायची की जेणेकरून त्या नदीच्या
पाण्याने टाकी भरत राहील, त्या टाकीत पाइप सोडायचा आणि ती पाईपलाईन खालच्या मार्गाने थेट गावात
आणायची, इथे आपण एक रूम बांधु आणि त्या रूममध्ये एक पाण्याची मोटर फिक्स करू आणि ती
पाईपलाईन त्या मोटर ला जोडली म्हणजे त्या नदीचे पाणी Direct आपल्या गावात येईल मग इथूनच आपण
लोकांना पाणी देऊ शकतो…..तर अशी आहे Idea. Innovation
हे ऐकून ते तिघं चांगली Idea आहे असं म्हणतात, त्यामध्ये जावेदला Idea खुपच आवडते पण बाकीचे दोघे
म्हणजे सुधाकर आणि रवीला अस वाटत की यात खुप खर्च आहे, अगोदरच जेमतेम पैसे कमावले आहे आणि
आता यात पैसे गुंतवले की खुप अडचणीचा सामना करावा लागेल आणि काय माहीत ही Idea Successful
होईल की नाही त्यामुळे घरातले कारण देऊन सुधाकर आणि रवी नाही जमणार अस म्हणतात. कल्पेश आणि
जावेद त्यांना खुप समजावतात पण त्यांचा नकारच ऐकायला मिळतो. कल्पेश आणि जावेद मात्र या Idea वर
काम करण्यास तयार होतात आणि लगेच कामाला लागतात.
दुसर्या दिवशी नेहमीप्रमाणे सुधाकर आणि रवी सायकल घेऊन नदीवर जाऊन पाणी गावात आणतात आणि
विकतात त्या उलट कल्पेश आणि जावेद ठरल्याप्रमाणे नदीजवळ एक टाकी बांधतात, तिथून पाईपलाईन
गावात आणतात इथे एक रूम बांधतात आणि त्या पाईपलाईन ला मोटर जोडतात. हे करण्यासाठी जवळपास
20 दिवस लागतात पण त्यांची Idea Successful झाली असते. सुधाकर आणि रवी ते 20 दिवस मात्र तेच काम
करत असतात पण त्यांची Idea Successful झालेली पाहुन पश्चाताप करत असतात.
इथे कल्पेश आणि जावेद चे काम खुप सोपे झाले असते आणि इथे राहूनच पैसा कमावतात ज्यामुळे सुधाकर
आणि रवीचे काम बंद होते आणि त्यांना कामासाठी दुसर्या गावात जावे लागते.
तात्पर्य :- चांगल्या युक्तीचे नेहमी समर्थन करावे.
Innovation