दुनियादारी
Worldliness

WORLDLINESS

एका खेडेगावात एक शेतकरी आपल्या पत्नी आणि लहान मुलासह राहत होता. त्यांच्याकडे एक गाढवही होतं. 

यांच्याकडे फारसे पैसे तर नव्हतेच. पण मिळेल त्यात हे कुटुंब समाधानी होतं. एकदा गावात दुष्काळ पडला. 

कुटुंबावर उपासमारीची वेळ आली. नाईलाजाने त्यानी गाढव विकण्याचा निर्णय घेतला. worldliness

बाप आणि मुलगा बाजारला जायला निघाले. मध्येच त्यांना काही गावकरी भेटले. ते त्यांना म्हणाले, ‘अहो, त्या 

गाढवाला नुसतंच कशाला चालत नेताय? तुमच्यापैकी एकाने त्यावर बसा की.’ त्यानुसार वडील मुलाला म्हणतात, 

‘बाळा तू लहान आहेस. उन्हाने तुला चटके बसत असतील. त्यामुळे तू गाढवावर बस.’ मुलगा गाढवावर बसतो.

WORLDLINESS

WORLDLINESS

पुन्हा थोडं चालल्यावर काही गावकरी भेटतात. ते गाढवावरच्या मुलाला पाहून ओरडतात, ‘काय रे मूर्खा, म्हातारा 

बाप उन्हात अनवाणी चालतोय आणि तू मात्र राजासारखा खुश्शाल गाढवावर बसलायस. काय लाज वगैरे आहे 

की नाही?’ हे बोलणं ऐकून मुलगा शरमतो. तो वडिलांना गाढवावर बसण्याची विनंती करतो. मग वडिल 

गाढवावर, मुलगा पायी असा प्रवास सुरु होतो. परत थोड्या अंतरावर काही गावकरी भेटतात. या बापबेट्याच्या 

जोडीला पाहून ते टोमणा मारतात, ‘बघा बघा एवढा मोठा बाप्या गाढवावर बसलाय आणि लहानगा पोरगा उन्हा-

तान्हात चालतोय. आता काय म्हणावं याला!’ हे ऐकून वडिल खजील होतात. ते मुलाला म्हणतात, ‘बाळा तू पण ये 

वर. आपण दोघंही गाढवावर बसू. मग आपल्याला कुणीच काहीच बोलणार नाही.’ मग दोघं गाढवावर बसून 

पुढचा प्रवास सुरु होतो. दूरवर काही गावकरी दिसतात. ते लांबूनच त्यांना पाहून खेकसतात. ‘अरे, तुम्ही माणसं 

आहात की हैवान? त्या मुक्या प्राण्याच्या अंगावर बसून काय जीव घेणार का त्याचा? जनाची नाहीतर मनाची तरी 

लाज ठेवा.’ हे बोल ऐकून बापबेटे अगदी शरमले. मग त्यांनी ठरवलं, आपल्यापैकी कुणीही गाढवावर बसलं तरी 

लोकं नावं ठेवतात. त्यापेक्षा आपणच या गाढवाला खांद्यावर घेऊ. त्यांनी गाढवाचे हात पाय बांधून, त्याला 

आपल्या खांद्यावर उचलून घेतलं.

WORLDLINESS

पुन्हा काही गावकरी भेटले. या जोडगोळीपाहून हसत हसत ते म्हणाले, 

तुमच्यातलं नेमकं गाढव कोण? हेच कळत नाही. गाढवाला चालत न्यायचं सोडून डोक्यावरून उचलून नेतायत… 

वेडपट कुठले!! आता मात्र बाप-बेटे दोघंही वैतागले. आपण काहीही केलं तरी लोकं आपल्याला नावंच ठेवतात. 

हे त्यांच्या लक्षात आलं. मग त्यांनी मनाशी पक्कं केलं, ‘ऐकावे जनाचे करावे मनाचे’. Worldliness  

तात्पर्य:- आपण सर्वांनाच समाधानी नाही करू शकत. त्यामुळे लोकांचे सल्ले जरूर ऐकावे योग्य वाटले तर 

ठीक, नाहीतर शेवटी आपल्याला वाटेल, पटेल तोच निर्णय घ्यावा.

WORLDLINESS

WORLDLINESS

Worldliness

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *